वर्धमाननगरमध्ये प्लास्टिक कंपनीला भीषण आग; परिसरात खळबळ!

– स्मॉल फॅक्टरी एरियातील कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी; अग्निशमन विभागाचे १० बंब घटनास्थळी दाखल

The Exposer
नागपूर : शहरातील वर्धमाननगर परिसरातील स्मॉल फॅक्टरी एरियामध्ये असलेल्या एका प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तातडीने धाव घेतली. प्लास्टिकच्या आगीमुळे सर्वत्र धूर पसरला आहे. हा धूर प्रचंड जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे अग्नीशमन विभागाच्या पथकाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत असल्याचे म्हटले जाते. आगीची तीव्रता लक्षात घेता तब्बल १० अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल करण्यात आले असून, जवानांकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

प्लास्टिक साहित्यामुळे आगीची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने अग्निशमन दलासमोर आग आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. परिसरातील सुरक्षिततेच्या दृष्टीनेही खबरदारी घेतली जात आहे.दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्घटनेत किती आर्थिक नुकसान झाले आणि कोणतीही जीवितहानी झाली आहे का, याबाबत अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More