– नागपूर महानगरपालिकेचे माजी उपआयुक्त अशोक पाटील यांच्या पत्नी; आज सायंकाळी ५ वाजता मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार
The Exposer
नागपूर : MOIL (मँगनीज ओर इंडिया लिमिटेड) येथे वरिष्ठ व्यवस्थापक (कायदा) पदावर कार्यरत असलेल्या डॉ. सौ. रिता अशोक पाटील यांचे आज पहाटे ४.१० वाजता निधन झाले. त्या नागपूर महानगरपालिकेचे माजी उपआयुक्त अशोक पाटील यांच्या पत्नी होत. त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिचित वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
डॉ. रिता पाटील यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वाजता मोक्षधाम दहन घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या राहत्या घरी, एम्प्रेस मिल चाळ, जोशीवाडी, रेल्वे पोलीस कॉलनीजवळ, वंजारीनगर रोड, मेडिकल कॉलेजच्या मागील बाजूस ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.
The Exposer- भावपूर्ण श्रद्धांजली!
Author: संतोष तायडे
संपादक















