The Exposer
नागपूर : नागपूरच्या पत्रकारिता क्षेत्रातील ज्येष्ठ आणि अनुभवी पत्रकार राजेंद्र उट्टलवार यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने नागपूरच्या पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली असून, एका अनुभवी पत्रकाराचा प्रदीर्घ पत्रकारितेचा प्रवास थांबला आहे.
राजेंद्र उट्टलवार यांनी आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीची सुरुवात दैनिक ‘जनवाद’मधून केली. त्यानंतर दैनिक ‘निर्मल महाराष्ट्र’, दैनिक ‘देशोन्नती’, ‘शंखनाद’ आणि दैनिक ‘पुढारी’ अशा विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी काम केले. या संपूर्ण प्रवासात दैनिक ‘देशोन्नती’मध्ये त्यांनी सर्वाधिक काळ कार्य केले. त्यामुळे देशोन्नतीसोबत त्यांचे विशेष नाते निर्माण झाले होते.
पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, विविध वृत्तपत्रांमधील कामाचा अनुभव आणि पत्रकारिता क्षेत्रातील सहकाऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यामुळे उट्टलवार यांची पत्रकार वर्तुळात वेगळी ओळख होती. नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यकारिणीतही त्यांनी सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
मानेवाडा घाटावर आज अंत्यसंस्कार
राजेंद्र उट्टलवार यांच्या पार्थिवावर आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास नागपुरातील मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा आप्तपरिवार आहे.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पत्रकारिता क्षेत्रातील सहकारी, मित्रपरिवार आणि परिचितांकडून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या निधनाने नागपूरच्या पत्रकारिता क्षेत्राने एक अनुभवी सहकारी गमावला आहे.
Author: संतोष तायडे
संपादक
















2 thoughts on “ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र उट्टलवार यांचे निधन; नागपूरच्या पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा”
वाईट बातमी…एकेकाळी माझा सहकारी होता ते…
सर,मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशोन्नतीला क्राईम रिपोर्टर म्हणून काम केले. दरम्यान त्यांच्याकडुन खूप काही शिकायला मिळाले.