उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर दीक्षाभूमीवर समाजनेत्यांचे मंथन!

– ९ डिसेंबरच्या भव्य मोर्चासाठी जय्यत तयारी; विविध सामाजिक संघटनांचा सहभाग

The Exposer
नागपूर : अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाचा मुद्दा, आरक्षणाचे भवितव्य आणि आगामी पिढ्यांवरील संभाव्य परिणामांवर चर्चा करण्यासाठी रविवारी (१५ नोव्हेंबर) नागपुरातील ऐतिहासिक दीक्षाभूमी येथे विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ९ डिसेंबर रोजी आयोजित भव्य मोर्चाच्या नियोजनावर सविस्तर विचारमंथन करण्यात आले.

उपवर्गीकरणामुळे शैक्षणिक संधी, आरक्षणाचे लाभ आणि सामाजिक प्रतिनिधित्वावर होणारे संभाव्य परिणाम लक्षात घेता समाजाने एकत्रित भूमिका घेण्याची गरज उपस्थितांनी व्यक्त केली. विविध सामाजिक संघटनांमध्ये समन्वय, एकजूट आणि आगामी आंदोलनाची दिशा यावरही चर्चा झाली. ९ डिसेंबरच्या मोर्चात जास्तीत जास्त समाजबांधवांचा सहभाग मिळविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला.

या बैठकीला प्रा. राहुल मून, दिनेश गोडघाटे, विलास भालेकर, विश्वास पाटील, माधवराव गावंडे (विदर्भ कुणबी समाज), अरुण शास्त्रकार (विदर्भ सुतार समाज), सागर दाभाडे, गितेश गजभिये, राजूभाऊ इंगोले, भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष भगवानजी कांबळे, आशिष फुलझले, अरुण गाडे, डॉ. जयप्रकाश बोधी, मच्छिंद्र सावळे, साहेबराव सिरसाट, सुभाष रामटेके, यशवंतराव चव्हाण, भीमराव मेश्राम, आशिष कांबळे, शितल मेंढे, दीपंकर वाकोडे, सचिन रामटेके, विनोद मेश्राम, सचिन डोंगरे, अजय कोसे आणि सनी मून यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत विलास भालेकर, तुषार नंदागवळी, अरुण गाडे, माधवराव गावंडे आणि अरुण शास्त्रकार यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. राहुल मून यांनी केले, संचालन आशिष फुलझले यांनी केले, तर आभार मोर्च्याचे मुख्य संयोजक मच्छिंद्र सावळे यांनी मानले. ९ डिसेंबरच्या मोर्चाच्या माध्यमातून समाजाची भूमिका आणि मागण्या प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच मोर्च्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More