प्रा. ममता काचोरे (गोमासे) यांना विधी शाखेत पीएच.डी.; नागपूर विद्यापीठाकडून संशोधन कार्याचा गौरव!

– सरोगसीच्या कायदेशीर पैलूंवर सखोल संशोधन; ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ’च्या प्राध्यापिकेची उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी

The Exposer
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ’ येथील प्राध्यापिका ममता विठ्ठलराव काचोरे (गोमासे) यांनी विधी शाखेत पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या यशामुळे शैक्षणिक आणि विधी क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

त्यांनी ‘Legal Aspects of Surrogacy in India – An Analytical Study’ या महत्त्वपूर्ण विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. भारतातील सरोगसीसंदर्भातील कायदेशीर तरतुदी, त्यातील विविध पैलू आणि कायदेशीर चौकटीचे विश्लेषण हा त्यांच्या संशोधनाचा केंद्रबिंदू होता.

या संशोधनासाठी त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉच्या प्राध्यापिका डॉ. प्रविणा खोब्रागडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे संचालक डॉ. रविशंकर मोर यांनीही त्यांना मार्गदर्शन केले. या शैक्षणिक यशाचे श्रेय प्रा. ममता काचोरे यांनी त्यांचे पती डॉ. मंगेश गोमासे, कन्या मनस्वी गोमासे तसेच काचोरे आणि गोमासे परिवाराला दिले आहे.

सातत्यपूर्ण अभ्यास, संशोधनाची जिद्द आणि मार्गदर्शकांचे सहकार्य यांच्या बळावर त्यांनी मिळविलेली ही पीएच.डी. पदवी त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More