महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा साजरी; शासनाच्या निर्णयाचे उल्लंघन झाल्याचा आरोप

– याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करा- भूषण दडवे

The Exposer
नागपूर : पुण्यातील गंजपेठ येथील ऐतिहासिक महात्मा फुले वाडा परिसरात वटपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करण्यात आल्याप्रकरणी वाद निर्माण झाला असून, शासनाने निश्चित केलेल्या नियमांचे व कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महात्मा फुले सामाजिक न्याय परिषद, महाराष्ट्रचे मुख्य संयोजक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण संघ (रजि.)चे सरचिटणीस भूषण दडवे यांनी केली आहे.

दडवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने महात्मा फुले वाड्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तेथे कार्यक्रम आयोजित करणे हे कायद्याच्या व शासनाच्या निर्देशांच्या विरोधात असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.

तसेच, कायद्याचे राज्य अबाधित राखण्यासाठी शासनाने कोणालाही विशेष वागणूक न देता समान निकषांवर कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर संबंधित पक्षाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More