नागपुरातील आमदारपुत्राचा भीषण अपघात? कारचा चक्काचूर; एकाचा मृत्यू, सहा युवक गंभीर!

– मध्यप्रदेशातील कुरई पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री दुर्घटना; मृतांमध्ये दानिश अली यांचा समावेश, जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू

The Exposer
नागपूर : नागपूरमधील एका आमदाराच्या मुलाचा मध्यप्रदेशात झालेल्या भीषण कार अपघातात गंभीर जखमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मध्यप्रदेशातील कुरई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या शनिवारी रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात घडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. या दुर्घटनेत एका युवकाचा मृत्यू झाला असून, आमदाराच्या मुलासह सहा युवक गंभीर जखमी झाल्याचे समजते. मृत युवकांमध्ये दानिश अली यांचा समावेश असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की धडक बसल्यानंतर कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्घटनेत कारमधील युवक गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.

दरम्यान, या अपघातात नागपुरातील एका आमदाराच्या मुलाचा समावेश असल्याची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. मात्र, संबंधित आमदाराच्या मुलाच्या अपघातातील सहभागासह जखमींची नावे आणि अपघाताची नेमकी कारणे याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. कुरई पोलिसांकडून अपघाताचा तपास आणि घटनेची अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच या दुर्घटनेचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. त्यात कार अपघाताच्या छायाचित्राबाबतही अधिकृत माहिती समोर आली नाही.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More