– चंद्रपूरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात; नेताजी बुरचुंडे यांना श्रद्धांजली

The Exposer
नागपूर : देशातील राजकीय परिस्थिती आणि भारतीय संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी लक्षात घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) आपली राजकीय भूमिका निश्चित करत असते, असे प्रतिपादन आरपीआयचे नागपूर प्रदेशाध्यक्ष प्रकाश कुंभे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाची संविधान मूल्यांप्रती बांधिलकी असल्याने राष्ट्रीय स्तरावरील घडामोडींना अनुसरून पक्षाची दिशा आणि भूमिका ठरविली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शाखा चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करत होते.
यावेळी व्यासपीठावर राज्य सचिव गोपाल रायपूरे, नागपूर प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सुमन, राज्य सचिव अशोक उमरे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मोरेश्वर चंदनखेडे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा नंदा रामटेके, विजय महेशगवळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्याच्या प्रारंभी रिपाईचे दिवंगत नेते नेताजी बुरचुंडे यांना पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर गोपाल रायपूरे, सिद्धार्थ सुमन, अशोक उमरे, प्रा. मुनिश्वर बोरकर, नंदा रामटेके, बाजीराव उंदिरवाडे, अजय चव्हाण, संतोष रामटेके, गुरुदास रामटेके, प्रा. पियुष मेश्राम आणि अरुण देवघडे यांनी समर्पक मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रविंद्रनाथ पाटील यांनी केले. मोरेश्वर चंदनखेडे यांनी प्रास्ताविक केले, तर संतोष रामटेके यांनी आभार मानले. या मेळाव्यास चंद्रपूर जिल्ह्यातील रिपाईचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: संतोष तायडे
संपादक











