– मिसिंग झालेले तब्बल ५५ मोबाईल शोधून मालकांना परत; साडेनऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
The Exposer
नागपूर : सिताबर्डी पोलिसांनी हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत उल्लेखनीय यश मिळवत तब्बल ५५ मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत. तांत्रिक विश्लेषण आणि आयएमईआय ट्रॅकिंगच्या आधारे विविध कंपन्यांचे मोबाईल हस्तगत करण्यात आले असून, जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची एकूण किंमत सुमारे ९ लाख ५० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गेल्या काही महिन्यांत सिताबर्डी हद्दीतील बाजारपेठा व गर्दीच्या परिसरातून मोबाईल हरवल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत तांत्रिक तपासाच्या माध्यमातून हरवलेले मोबाईल शोधून काढले. मोबाईल मालकांना त्यांचे फोन सुरक्षित स्थितीत परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.
या कारवाईमुळे सिताबर्डी पोलिसांच्या तांत्रिक तपास क्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून, हरवलेल्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त विनिता साहू, पोलीस उपायुक्त अनुपूर्णा सिंह, सहाय्यक पोलीस आयुक्त किरण पोपळघट यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनीष कोल्हटकर यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि श्याम वारंगे, पोहवा नंदकिशोर वाल्दे, पोशि शत्रुघ्न मुंडे, प्रशांत भोयर, चेतन शेंडे आणि विक्रमसिंग ठाकूर यांनी ही यशस्वी कामगिरी बजावली.
Author: संतोष तायडे
संपादक











