चंद्रपुरात आरपीआयचा शक्तिप्रदर्शन मेळावा; पक्ष बळकटीसाठी कार्यकर्त्यांचा महासंकल्प!

– १४ जूनला जिल्हास्तरीय मेळावा; नियुक्तीपत्र वितरणासह वार्षिक रणनीती ठरणार
– चंद्रपूरात रिपब्लिकन पक्षाची मोठी जमवाजमव; संघटन विस्ताराचा बिगुल वाजणार!

The Exposer
नागपूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) जिल्हा चंद्रपूरच्या वतीने रविवार, १४ जून २०२६ रोजी जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे दुपारी १२ ते ५ या वेळेत हा मेळावा पार पडणार असून जिल्हाभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय नेताजी वि. तु. बुरचुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. तसेच विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात येणार असून पक्षाच्या आगामी वार्षिक कामकाजाचे नियोजन, संघटन विस्तार आणि जनहिताच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे नागपूर प्रदेश अध्यक्ष प्रकाश कुंभे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य सचिव गोपाल रायपुरे, अशोक उमरे, नागपूर प्रदेश सचिवणीस सिद्धार्थ सुमन तसेच महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष नंदाताई रामटेके उपस्थित राहणार आहेत.
जिल्हाध्यक्ष मोरेश्वर चंदनखेड़े आणि जिल्हा महासचिव रवींद्रनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा ठरणार महत्त्वाचा

चंद्रपूरमध्ये पक्ष संघटन अधिक सक्षम करण्यासाठी, नव्या पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपविण्यासाठी आणि आगामी राजकीय वाटचालीची दिशा निश्चित करण्यासाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे पक्षाच्या वर्तुळातून सांगण्यात आले आहे. जिल्हाभरातील आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये या मेळाव्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More