वोकहार्ट हॉस्पिटलसमोर भरधाव चारचाकीचा कहर!

– ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी; धडक देत चालक फरार
– सीसीटीव्ही तपासण्याची मागणी, बजाजनगर पोलिसांची वाढली जवाबदारी
The Exposer
नागपूर : धरमपेठ परिसरातील वोकहार्ट हॉस्पिटलसमोर भरधाव वेगाने धावणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने एका ज्येष्ठ नागरिकाला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना ११ जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या अपघातात ७१ वर्षीय दिपक वासुदेवराव वाकडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वोकहार्ट रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. प्राप्त माहितीनुसार, प्लॉट नंबर 57, बाजीप्रभूनगर, अभ्यंकरनगर येथील रहिवासी दिपक वाकडे हे रात्रीं सुमारे ८ वाजता उपचारासाठी मुलीच्या घराकडे दुचाकीने वोकहार्ट रुग्णालय, शंकरनगर येथील गल्ली परिसरातून जातं होते. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते रस्त्यावर कोसळले आणि त्यांच्या डोक्याला, पायाला, कानाला व नाकाला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या डोक्यावर गंभीर मार लागला आहॆ.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमी दीपक यांना जवळच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र अपघातास कारणीभूत ठरलेला चालक वाहनासह पसार झाला. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जखमींची फिर्यादी मुलगी केतकी दीपक वाकडे रा. प्लॉट नंबर 48, सॅन कॅपिटल, डागा लेआऊट, नागपूर यांनी वोकहार्ट रुग्णालयात चौकशीसाठी आलेल्या बजाजनगर पोलिसांना दिलेल्या बयानात घटनेची माहिती दिली. यावेळी त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची आणि फरार वाहनचालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More