– यशाला सलाम, सीईटीमध्ये 100 टक्के गुण मिळविले
– कार्यकर्त्यांनी गुणवंतांचा सन्मान करून दिला प्रेरणेचा संदेश
The Exposer
नागपूर : हावरापेठ येथील कु. क्रिस्तीना आशिष जेबक हिने महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) मध्ये 100 पर्सेंटाइल गुण मिळवत राज्यात द्वितीय क्रमांक तर नागपूरमधून प्रथम क्रमांक पटकावून शहराचे आणि परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.
क्रिस्तीनाच्या या अभूतपूर्व यशाची दखल घेत हावरापेठ मित्र मंडळाच्या वतीने तिच्या निवासस्थानी जाऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थिनीचा सन्मान करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या. यावेळी मंगेश मोरे, गजेंद्र मडावी, राजू इटनकर, रमेश मेहर आणि मनोहर मोरे उपस्थित होते.
क्रिस्तीनाच्या यशाचा गौरव करण्यासाठी कार्यकर्ते स्वतः तिच्या घरी पोहोचल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याची ही कृती इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. अशा गौरवामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतोच, शिवाय समाजात शिक्षण आणि गुणवत्तेला मिळणाऱ्या सन्मानाचाही सकारात्मक संदेश पोहोचतो.
“गुणवंतांचा सन्मान म्हणजे उज्ज्वल भविष्यातील गुंतवणूक”, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. क्रिस्तीनाच्या यशामुळे हावरापेठ परिसराचा अभिमान आणखी उंचावला असून तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











