NEET गैरप्रकारांविरोधात रिपब्लिकन पार्टीचे संविधान चौकात धरणे आंदोलन

– विद्यार्थ्यांना न्याय द्या; दोषींवर कठोर कारवाई करा, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

The Exposer
नागपूर : NEET परीक्षेतील कथित गैरप्रकार, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) नागपूर शहरच्या वतीने संविधान चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणावी आणि गैरप्रकारांची उच्चस्तरीय, निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशीही मागणी आंदोलकांनी केली.
हे आंदोलन शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने पार पडले. यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, नागपूर शहरच्या वतीने प्रशासनामार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी प्रकाश कुंभे, क्षितिज गायकवाड, रजत महेशगवळी, मनोज वासनीक, सुरेश खोब्रागडे, आशिष मेश्राम, विजय महेशगवळी, अश्वजीत गायकवाड, प्रशिक गाडगे, राकेश भलावी, ज्ञानदीप गायकवाड, रामदास गजभिये, अनिरुद्ध अंबादे, सुमित गवई, राकेश धारगावे, शरद मेश्राम, मिलिंद पोटमासे, पँथर अनिल मेश्राम, ऋषी मुन, अशोक बागडे, नितीन गायकवाड, अश्विन सोनटक्के, राजेश ढेंगरे, मुकुंद मेंढे, आनंद मेश्राम, रोहित गायकवाड, मनोज कडवे, गोपीचंद अंभोरे, प्रेमदास चहादे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More