– दोन आरोपी जेरबंद, तलवार व धारदार चाकू हस्तगत
The Exposer
नागपूर : कळमना पोलीस ठाणे हद्दीतील गुलमोहर नगर परिसरात अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून तलवार व दोन धारदार चाकू जप्त केले आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.
खबरीमार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी स्टाफसह छापा टाकला असता कुणाल मोहन बंजारे (वय 19) याच्या घरातून सुमारे ₹5 हजार किमतीची स्टीलची तलवार जप्त करण्यात आली. चौकशीत ही तलवार त्याने तरुण उर्फ शिवम शत्रुघ्न वर्मा (वय 23) याच्याकडून घेतल्याचे उघड झाले.
यानंतर पोलिसांनी दुसऱ्या आरोपीच्या घराची झडती घेतली असता दोन धारदार स्टीलचे चाकू जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांची एकूण किंमत सुमारे ₹6,600 असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुप्त माहितीवरून झडप, आरोपींना तत्काळ बेड्या
गुलमोहर नगर परिसरात शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हालचाली करत आरोपींचा शोध घेतला आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वेगवान कारवाई करून दोघांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल, सहपोलीस आयुक्त विवेकानंद रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त नित्यानंद झा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओखळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी केली. या कारवाईसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने प्रभावी कामगिरी बजावली. या पथकामध्ये पोउपनि संतोषकुमार रामलोड, पो.हवा. रविकुमार शाहू, पो.हवा. प्रदीप पवार, पो.अं. मंगेश लोही, पोअं संतोष पांडे, पोअं अनिल जाधव आणि पोअं प्रफुल्ल गोहोकार यांचा समावेश होता.
Author: संतोष तायडे
संपादक











