– तिघा आरोपींना अटक; 1.81 लाखांचा मुद्देमाल जप्त
The Exposer
नागपूर : शहर गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने प्रभावी कारवाई करत जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणत तिघा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेला व गुन्ह्यात वापरण्यात आलेला एकूण ₹1,81,400 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे पथक राजाबाक्षा हनुमान मंदिरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर, पोलीस ठाणे इमामवाडा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून संशयित व्यक्तींबाबत माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन दोन पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरण्यात आलेले साहित्य आढळून आले.
अभिलेखांची पडताळणी केल्यानंतर या आरोपींकडून पोलीस ठाणे इमामवाडा येथील गुन्हा क्र. 211/2026 (कलम 309(4), 3(5) बीएनएस) तसेच पोलीस ठाणे अजनी येथील गुन्हा क्र. 276/2026 (कलम 304(2), 3(5) बीएनएस) हे जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आल्याचे निष्पन्न झाले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद सरफराज उर्फ सैफु मोहम्मद इजराईल (वय 20), अयान अली रिजवान अली (वय 21) आणि शेख सोहेल उर्फ बिट्टू शेख फारूक (वय 22) यांचा समावेश आहे. तिघेही नागपूर शहरातील रहिवासी आहेत.
कारवाईदरम्यान पोलिसांनी 05 ग्रॅम वजनाचे पिवळ्या धातूचे लॉकेट, गुन्ह्यात वापरलेली एक्सेस कंपनीची दुचाकी, लोखंडी धारदार चाकू, दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ₹1,81,400 किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना पोलीस ठाणे इमामवाडा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने तत्परतेने व कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे पार पाडली असून, त्यामुळे जबरी चोरीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











