– सराईत आरोपी जेरबंद, देत होता पोलिसांना हुलकावणी
The Exposer
नागपूर : शहर गुन्हे शाखेच्या युनिट-5 पथकाने भांडेवाडी, वाठोडा आणि पारडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल पाच घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आरोपीला अटक करून महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आयुष उर्फ आमला नंदलाल गणवीर (वय 21 वर्षे) असे असून तो भांडेवाडी येथील हनुमान नगर परिसरातील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध भांडेवाडी, वाठोडा आणि पारडी पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडीचे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांमध्ये आरोपी बराच काळ पोलिसांना हुलकावणी देत होता. गुन्हे शाखा युनिट-5 च्या पथकाने तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.
अटकेनंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील चौकशी व कायदेशीर कारवाईसाठी त्याला आवश्यक कागदपत्रांसह भांडेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे भांडेवाडी, वाठोडा आणि पारडी परिसरातील घरफोडीच्या घटनांच्या तपासाला गती मिळणार असून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











