नवीन अधिकाऱ्यांचा दणका; ‘शाम-रवी’च्या एकछत्री साम्राज्याला हादरा?

– नाईट कल्चरला ब्रेक, रेती तस्करीवर लगाम; वसुलीबाजांच्या गोटात खळबळ

The Exposer
नागपूर : एकीकडे राज्यात अन्न व औषधी प्रशासनाचे प्रमुख तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाईने खळबळ उडवून दिली आहॆ. त्याच प्रमाणे बेलतरोडी परिसरात नवीन अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच अवेध धंदे व रात्रीं उशिरापर्यंत चालणाऱ्या हॉटेल, ढाबे व सावजी मालकांचे कारवाईच्या भीतीने धाबे दणाणल्याची चर्चा रंगली आहॆ. त्यामुळे अनेक वर्षांपासून चर्चेत असलेले ‘शाम-रवी’ हे नाव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

परिसरातील सामाजिक, व्यावसायिक आणि राजकीय वर्तुळात या घडामोडींवरून विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या चर्चेनुसार, नवीन अधिकाऱ्यांनी रुजू होताच रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या तथाकथित ‘नाईट कल्चर’ला मोठा ब्रेक लागल्याचे बोलले जात आहे. वर्धा रोड परिसरातील काही हॉटेल, ढाबे, सावजी भोजनालये तसेच स्मोकिंग कॅफेंवर प्रशासनाची नजर वळल्याने संबंधित व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे.

याचबरोबर बेसा, बेलतरोडी, गोटाळ पांजरी, शंकरपूर आणि परिसरात सुरू असलेल्या विना-रॉयल्टी रेती व मुरूम वाहतुकीवरही अंकुश बसल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाने आवळलेला कारवाईचा फास पाहता अवैध धंद्यांशी संबंधित घटकांचे चांगलेच धाबे दणाणल्याची चर्चा स्थानिक पातळीवर ऐकायला मिळत आहे.

परिसरातील चर्चांनुसार, काही वर्षांपासून कथित वसुलीच्या बळावर अनेक अवैध धंद्यांना संरक्षण मिळत असल्याच्या चर्चा रंगत होत्या. ‘शाम-रवी’ या नावाभोवती फिरणाऱ्या या चर्चांमुळे अनेकांना मोकळे रान मिळाल्याचे आरोपही स्थानिक स्तरावर केले जात होते.

नवीन अधिकाऱ्यांच्या आगमनानंतर परिस्थितीत बदल होत असल्याचे चित्र दिसत असून, यामुळे पूर्वी प्रभावशाली मानल्या जाणाऱ्या काही घटकांच्या एकछत्री वर्चस्वाला धक्का बसत असल्याची चर्चा सुरू आहे. परिणामी ‘शाम-रवी’ हे नाव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

मात्र, या सर्व चर्चांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नसून संबंधित शासकीय यंत्रणांनीही कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. तरीसुद्धा बेलतरोडी, बेसा, गोटाळ पांजरी, शंकरपूर आदी परिसरातील बदलत्या घडामोडींमुळे नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, आगामी काळात प्रशासनाची भूमिका आणि पुढील कारवायांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(टीप : वरील वृत्त स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या उलट सुलट चर्चांवर आधारित असून संबंधित आरोप व दावे यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.)

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More