नागपुरातून तब्बल ₹1.53 कोटींची ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बस चोरी; 24 तासांत आरोपी जेरबंद!

The Exposer
नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बस चोरी प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली आहे. 1 जुलै 2026 रोजी मध्यरात्री नागपूरच्या इमामवाडा बसस्थानकातील चार्जिंग स्टेशनवर उभी असलेली सुमारे ₹1.53 कोटी किंमतीची ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बस (MH 49 BZ 8258) अज्ञात व्यक्तीने चोरून नेली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. अवघ्या 24 तासांच्या आत अमरावतीतील नंदा मार्केट परिसरातून बस जप्त करण्यात आली आणि आरोपीला अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विष्णू गणपती नीलावर (वय 23) असून तो तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्याचा रहिवासी आहे. प्राथमिक चौकशीत त्याने नागपुरातून बस चोरी केल्याची कबुली दिली आहे. तसेच यापूर्वीही विविध राज्यांमधून बस चोरी केल्याचा संशय पोलिस व्यक्त करत आहेत.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी बस सुरक्षित ठिकाणी नेऊन तिची बॅटरी, टायर आणि इतर महागडे सुटे भाग काढून विकण्याचा प्रयत्न करत असे. या प्रकरणामुळे एसटी बसस्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था आणि चार्जिंग स्टेशनवरील देखरेखीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेचा अधिक तपास सुरू असून, आरोपीच्या इतर गुन्ह्यांचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More