सरकारच्या धोरणांविरोधात बीआरएसपीचा एल्गार

– उपवर्गीकरण, आरक्षण आणि हिंदुत्ववादी अजेंड्यावर 26 जुलैला नागपुरात जाहीर व्याख्यान

The Exposer
नागपूर : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी (बीआरएसपी)ने एल्गार पुकारला असून, एससी, एसटी, ओबीसी उपवर्गीकरण, आरक्षण, हिंदुत्ववादी अजेंडा आणि सत्तेचे केंद्रीकरण या मुद्द्यांवर 26 जुलै 2026 रोजी दुपारी 2.30 ते 5.00 या वेळेत विपश्यना भवन, सुगत कॉलनी, नागपूर येथे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या व्याख्यानात बीआरएसपीचे संस्थापक अध्यक्ष ऍड. डॉ. सुरेश माने प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करणार असून, माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे प्रमुख वक्ते म्हणून सरकारच्या धोरणांवर, सामाजिक न्याय, संविधानिक हक्क आणि आरक्षणाशी संबंधित मुद्द्यांवर बीआरएसपीची भूमिका मांडणार आहेत.

बीआरएसपीसह बुद्धिस्ट रिसर्च सेंटर, भारतीय भागीदारी मिशन, भारतीय आदिवासी एकता परिषद, दलित आदिवासी एकता परिषद आणि बहुजन साहित्य कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More