दैनिक ‘जनवार्ता’चे संपादक किशोर सहारे यांचे हृदयविकाराने निधन

The Exposer
नागपूर : दैनिक जनवार्ताचे संपादक किशोर परसराम सहारे (वय ६२) यांचे शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी हैदराबाद येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

किशोर सहारे हे नागपूर येथील ४०४, प्रथमेश प्लाझा, उंटखाना येथे वास्तव्यास होते. पत्रकारितेतील त्यांच्या प्रदीर्घ आणि अभ्यासपूर्ण योगदानामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रासह मित्रपरिवार आणि समाजात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.०० च्या सुमारास मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार केले जातील.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More