– पक्ष मजबूत करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा कार्यकर्त्यांचा संकल्प
The Exposer
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र आणि रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या १०१व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या ऐक्याचा आणि संघटनात्मक बळकटीकरणाचा निर्धार केला. २५ सप्टेंबर रोजी कर्मवीर बाबू हरिदासजी आवळे स्मृती परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर बाबू हरिदासजी आवळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. त्यानंतर आवळे बाबू चौक (कमाल चौक) येथून रॅली काढण्यात आली. ही रॅली इंदोरा चौक येथे पोहोचल्यानंतर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांनी रिपब्लिकन पक्षाला पुन्हा संघटित व मजबूत करण्याचा निर्धार केला. नागपूर शहरासह राज्यातील पक्षाची संघटनात्मक स्थिती सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
“आता एकी केली नाही तर समाजाची राजकीय परिस्थिती आणखी बिकट होईल. त्यामुळे सर्व रिपब्लिकन नेते आणि कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने सामाजिक व राजकीय प्रश्नांसाठी पुढे आले पाहिजे,” असे आवाहन यावेळी करण्यात आले.
जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा निर्धार
आगामी काळात जनतेच्या विविध प्रश्नांवर रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धारही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान “एकच लक्ष्य—रिपब्लिकन पक्ष”, “बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे अमर रहे”, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. नागरिकांनीही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

कार्यक्रमाचे मुख्य संयोजक बाळू मामा कोसमकर, रामदास गजभिये, संजय पाटील, चंद्रकांत पाटील, निरंजन वासनिक, राजकुमार मेश्राम, अजय बोरकर, यशवंत तेलंग, नरेश वाहाने, विश्वास पाटील, राजू गजभिये आणि हिरालाल बोरकर यांच्यासह समूहघोष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष उमेश बोरकर उपस्थित होते.
याशिवाय गोपिचंद अंबोरे, डी.एम. बेलेकर, राज सुखदेवे, गुलाब नंदेश्वर, ओमप्रकाश सोमकुंवर, नवनित मोटघरे, किशोर शेंडे, यादवराव पाटील, संदीपसिंग अग्रवाल, सुरेश पाटील, मनोज गणवीर, बी.टी. वाहणे, आनंद वानखेडे, आर.एम. मेश्राम, सुधीर पाटील, आनंदराव खोब्रागडे, विनयानंद नगरारे आणि डॉ. जनबंधू भिमराव चवरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच ईश्वर सूर्यवंशी, हेमंत नंदेश्वर, सुरेश बोधनकर, गोवर्धन साहारे, शेखर चौधरी, राजू फुलके, नरेंद्र चौधरी, राजू टेभुर्णे, भगवान गजभिये, सुरेश मानवटकर, मनोहर गायकवाड, सचिन चौधरी, सुरेंद्र भास्कर, विवेक मेश्राम, दिनेश साखरे, रमेश गेडाम, चंद्रमणी गजभिये, सुदर्शन मुन, दिलीप तांदळे, जयकिशन गजभिये, हरीष जानोरकर, किशोर मेश्राम, नंदकिशोर बोरकर, संजय इंदुलकर, सिद्धार्थ पाटील, बाळुभाऊ वांद्रे आणि शैलेश कंभु यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
Author: संतोष तायडे
संपादक















