वरिष्ठ उपसंपादक चंद्रशेखर महाजन यांना पितृशोक; रामदास महाजन यांचे निधन

The Exposer
नागपूर : दैनिक सकाळचे वरिष्ठ उपसंपादक तथा पत्रकार चंद्रशेखर महाजन यांचे वडील रामदास इस्तारी महाजन (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

रामदास महाजन हे मूळचे भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील निलज येथील रहिवासी होते. सध्या ते नरसाळा येथील नीलकमल नगर परिसरातील जनसेवा हाऊसिंग सोसायटीमध्ये वास्तव्यास होते.

त्यांच्या पश्चात दुधराम महाजन, चंद्रशेखर महाजन आणि जयेंद्र महाजन अशी तीन मुले व परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता दिघोरी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पत्रकार चंद्रशेखर महाजन आणि महाजन कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत, दिवंगत रामदास महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

– The Exposer 

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More