छत्तीसगडमधील मिनी इंडिया पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत नागपूरच्या खेळाडूंची सुवर्णकामगिरी

The Exposer
नागपूर : छत्तीसगड पॉवर लिफ्टिंग असोसिएशनतर्फे 12 ते 14 जून दरम्यान रायपूर येथील सुंदर नगरमधील कुर्मी सभागृहात आयोजित मिनी इंडिया पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये नागपूरच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले.

या स्पर्धेत आनंद दार्वेकर यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत 4 सुवर्णपदके आणि 2 रौप्यपदके पटकावली. तर रमेश माटे यांनी 2 सुवर्णपदके जिंकून नागपूरच्या क्रीडा क्षेत्राचा मान उंचावला. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत दोन्ही खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या यशामुळे नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

या यशाचे श्रेय खेळाडूंनी छत्तीसगड पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी माणिक तांब्रकर, प्रशिक्षक व मार्गदर्शक दिलीप भंडारे, तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनू मांडपे, संदीप मेश्राम, कैलास सोमकुवर, राजू लोखंडे आणि इतर सहकाऱ्यांना दिले आहे. खेळाडूंच्या या यशाबद्दल विविध क्रीडा संघटना, सामाजिक संस्था आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More