– वाहन चोरी विरोधी पथकाची धडक कारवाई, तीन आरोपी जेरबंद
The Exposer
नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने कोराडी पोलिस ठाणे हद्दीतील चारचाकी वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेली मारुती सुझुकी ओमनी कार तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस ठाणे कोराडी येथे दाखल असलेल्या अप. क्र. २०८/२०२६, कलम ३०३(२) भा.न्या.सं. अंतर्गत वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर अब्दुल रब उर्फ मस्तान नियाज अन्सारी, राहील कलाम शेख आणि आबिद अहमद उर्फ समीर सफिक अहमद (सर्व रा. यशोधरा नगर, नागपूर) यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान आरोपींकडून चोरीस गेलेली मारुती सुझुकी ओमनी (MH-31-AS-6796) किंमत ५० हजार रुपये तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली बजाज पल्सर एनएस (MH-49-CR-4117) किंमत १ लाख रुपये जप्त करण्यात आली. या प्रकरणात फैजान (रा. मांजरी), जसिन उर्फ बौवा आणि सिराज उर्फ कालू (दोघेही रा. यशोधरा नगर, नागपूर) हे आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
आरोपींसह जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी कोराडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या कारवाईत सायबर युनिट, गुन्हे शाखेने विशेष सहकार्य केले. वाहन चोरी विरोधी पथकाच्या या कारवाईमुळे कोराडी परिसरातील वाहन चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा झाला असून पोलिसांच्या तत्पर तपासाचे कौतुक होत आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











