नागपूर पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे-पाटील; डॉ. रवींद्र सिंघल यांची एसीबीच्या एडीजीपदी बदली

– राज्य शासनाचा मोठा प्रशासकीय निर्णय; नागपूर पोलीस दलाला नवे नेतृत्व

The Exposer
नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत महत्त्वाचा शासन आदेश जारी केला असून, वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांची नागपूर शहर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यमान नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) चे अपर पोलीस महासंचालक (ADG) म्हणून बदली करण्यात आली आहे.

गृह विभागाने 23 जून 2026 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, विश्वास नांगरे-पाटील हे सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अपर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. आता त्यांच्याकडे नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

दुसरीकडे, नागपूर शहराचे विद्यमान पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांना एसीबीच्या अपर पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे. या बदल्यांमुळे नागपूर पोलीस दलाच्या नेतृत्वात महत्त्वाचा बदल झाला आहे.

शासन आदेशात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित अधिकाऱ्यांनी न्यायालयीन आदेश, निवडणूक आचारसंहिता तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या बाबींचा विचार करून पुढील आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More