नागपुरात वाहनचोर टोळीचा पर्दाफाश, क्राईम ब्रँच युनिट-5 ची धडाकेबाज कारवाई

– 10 चोरीची वाहने जप्त, 9.66 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

The Exposer
नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक-5 ने वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 10 चोरीची वाहने आणि घरफोडीतील मुद्देमालासह एकूण 9 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील वाहन चोरीच्या 10 गुन्ह्यांसह एका घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तहसील परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाहन चोरी केल्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शहानवाज शाह उर्फ गुलजार शाह (19), फैजान खान (25) तसेच दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे. आरोपींकडून विविध भागांतून चोरी करण्यात आलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या.

पोलिसांच्या तपासात यशोधरा नगर, धंतोली, सीताबर्डी, कापील नगर, कोराडी आदी पोलीस ठाण्यांतील एकूण 10 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले. तसेच तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी प्रकरणातील मुद्देमालही हस्तगत करण्यात आला.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 10 दुचाकी वाहने (8.30 लाख रुपये) आणि घरफोडीतील 1.36 लाख रुपयांचा ऐवज असून एकूण किंमत 9.66 लाख रुपये आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त रांजनेश धामणे, पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) डॉ. दिपक अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. युनिट-5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More