– नागपुरातील बनावट पॅकिंगचा मोठा पर्दाफाश
The Exposer
नागपूर : केंद्रीय तपास यंत्रणांच्या सातत्याने सुरू असलेल्या धाडी आणि कारवायांनंतरही नागपुरात सुपारीच्या काळाबाजारावर पूर्णविराम लागलेला नसल्याचे समोर आले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे आणलेली आयातीत सुपारी, स्थानिक स्तरावर नव्या पॅकिंगमध्ये भरून बाजारात विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या व्यवसायातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती समोर येत आहे. तपास यंत्रणांनी यापूर्वी अनेक ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात सुपारी जप्त केली होती. मात्र, या कारवायांनंतरही काही व्यावसायिकांनी नवीन मार्ग अवलंबत हा अवैध व्यवसाय सुरूच ठेवला असल्याचे वृत्त आहे. विशेषतः नागपुरातील काही गोदामांमध्ये सुपारीचे पॅकिंग बदलून ती कायदेशीर असल्याचा आभास निर्माण केला जात असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, या प्रकरणात संबंधित विभागांनी अधिक व्यापक तपास करून पुरवठा साखळी, गोदामे, वाहतूक आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी होत आहे. केवळ छापेमारीपुरती कारवाई न करता या काळाबाजारामागील संपूर्ण रॅकेट उघड करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्येही या प्रकरणामुळे चिंता व्यक्त होत असून, केंद्रीय आणि राज्य यंत्रणांनी समन्वयाने कठोर कारवाई करून अवैध सुपारी व्यवसायावर कायमस्वरूपी आळा घालावा, अशी मागणी पुढे येत आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











