– वाहन सुरक्षिततेबाबत चालकांना मार्गदर्शन; फिटनेस प्रमाणपत्रांसह विविध बाबींची तपासणी
The Exposer
नागपूर : नागपूर शहर स्कूल व्हॅन चालक संघटनेच्या सौजन्याने व प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) सहकार्याने गोरेवाडा रोडवरील पालोटी शाळेत स्कूल व्हॅन व बस वाहन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला मोठ्या संख्येने स्कूल व्हॅन व बस चालकांनी प्रतिसाद देत आपल्या वाहनांची तपासणी करून घेतली तसेच आवश्यक प्रमाणपत्रे प्राप्त केली.
या शिबिराला प्रादेशिक परिवहन अधिकारी समीपा चिकटे, भरत महाजन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल चौधरी व स्वप्निल अटेल, नागपूर शहर स्कूल व्हॅन चालक संघटनेचे अध्यक्ष अफसर खान तसेच पालोटी शाळेचे प्राचार्य सिंग ऑगस्टीन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी आरटीओ अधिकाऱ्यांनी उपस्थित चालकांना शालेय वाहनांच्या सुरक्षिततेसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्येक वाहनामध्ये प्रथमोपचार पेटी, अग्निशामक यंत्र, वैध फिटनेस प्रमाणपत्र, चालकाचा परवाना व बॅज, तसेच निर्धारित गणवेश असणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुजाहिद अहमद, नरेंद्र रोहनकर, मोहम्मद जमीर अहमद, अभय बघेल, फारुख पठाण, प्रकाश देवताडे, काझी मुस्तकीम, प्रकाश भाई, अनुप भाई तसेच पालोटी शाळेतील स्कूल व्हॅन व बस चालक-मालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लालचंद मिश्रा यांनी केले.
Author: संतोष तायडे
संपादक











