– पोलिस आणि क्राईम ब्रँचची कसून चौकशी सुरू
The Exposer
नागपूर : शहरातील कमाल चौक परिसरात गुरुवारी मध्यरात्री उशिरा गोळीबार झाल्याची माहिती समोर येत असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, रात्री सुमारे १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शनिचरा मार्केट, कमाल चौक परिसरात गोळीबाराची घटना घडल्याची चर्चा आहे.
घटनेत दोन संशयितांचा सहभाग असल्याचे स्थानिक स्तरावर बोलले जात आहे. तसेच त्यांचा मकोका प्रकरणाशी संबंध असल्याचीही चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.
गोळीबाराचे नेमके कारण, आरोपींची ओळख आणि घटनेमागील हेतू काय होता, याचा शोध पोलीस घेत आहेत. अधिकृत माहितीनंतर या प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











