– गृह मंत्रालयाकडून “अतिउत्कृष्ट सेवा पदक”; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सन्मान
The Exposer
नागपूर : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने २५ वर्षांपेक्षा अधिक काळ दीर्घ, समर्पित आणि निष्कलंक सेवा बजावत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल Acp नरेंद्र हिवरे यांना “अतिउत्कृष्ट सेवा पदक” जाहीर करून गौरव केला आहे.

महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांच्या वतीने १५ ऑगस्ट २०२६ च्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या मानाच्या पदकाची घोषणा करण्यात आली होती. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आज विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित ध्वजवंदन कार्यक्रमात महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते सहायक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे यांना हे पदक प्रदान करण्यात आले.
दीर्घकाळाची निष्ठावान सेवा, कर्तव्याप्रती असलेली अढळ बांधिलकी आणि निष्कलंक कार्याची ही अत्यंत अभिमानास्पद पावती मानली जात आहे. २५ वर्षांहून अधिक काळ प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने Acp हिवरे यांनी बजावलेल्या सेवेला मिळालेला हा सन्मान संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.
कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर Acp नरेंद्र हिवरे यांनी मिळालेल्या या गौरवामुळे पोलीस दलातही कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Author: संतोष तायडे
संपादक















