महापुरुषांच्या विचारांना मानवंदना; समता-बंधुत्वाचा बुलंद जागर!

– अनागरिक धर्मपाल, पेरियार रामस्वामी नायकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिनिमित्त समूहघोष मैत्री परिवाराचे अभिवादन

The Exposer
नागपूर : समता, सामाजिक प्रबोधन, बंधुता आणि परिवर्तनाचा विचार समाजात रुजविणाऱ्या महापुरुषांना स्मरण करत समूहघोष मैत्री परिवारातर्फे अनागरिक धर्मपाल, पेरियार रामस्वामी नायकर, प्रबोधनकार ठाकरे आणि भैय्यासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण करण्यात आली.

बाबू कर्मवीर हरिदासजी आवळे स्मृती परिसर, आवळे बाबू चौक, नागपूर येथे महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि परिवर्तनवादी विचारांचा जागर करण्यात आला.

हा अभिवादन कार्यक्रम भन्ते नागदिपांकर महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाला संजय फुलझेले, सुरेश पाटील, उमेश बोरकर, संजय सोमकुवर, नरेश वाहणे, भगवान गजभिये, दर्शन सहारे, वीरेंद्र मंडपे, प्रदीप वागदे, अशोक नगरारे, मनोहर गायकवाड, इंद्रपाल वाघमारे, नरेश महाजन, चंदू गोटे, ईश्वर सूर्यवंशी, अजय वासनिक यांच्यासह परिवाराचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महापुरुषांच्या स्मृतीला अभिवादन करताना समता, सामाजिक न्याय आणि मानवतावादी मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More