मिसिंग 12 वर्षीय मुलाचा 12 तासांत शोध!

– लकडगंज पोलिसांच्या तपास पथकाची तत्परता; मुलाला सुखरूप ताब्यात घेतले

The Exposer
नागपूर : नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या 12 वर्षीय मुलाचा अवघ्या 12 तासांत शोध घेण्यात लकडगंज पोलिसांना यश आले. पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे मुलाला सुखरूप ताब्यात घेण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार 12 वर्षीय मुलगा मिसिंग झाल्याची माहिती लकडगंज पोलिसांना मिळाली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विलंब न करता तपासाची चक्रे फिरवली. पोलीस ठाणे लकडगंज येथील तपास पथकाने (DB) विविध ठिकाणी शोध घेतला. उपलब्ध माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करत पथकाने अथक प्रयत्न सुरू ठेवले. अखेर अवघ्या 12 तासांच्या आत मुलाचा शोध घेऊन त्याला सुखरूप ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई वरिष्ठ pमुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI दीपक पोकळे, HC गणेश ठाकूर, PC मुदस्सीर शेख, PC विनोद टिकस, PC कुणाल मसराम आणि PC सुरज मडावी यांनी केली. लकडगंज पोलिसांच्या वेगवान तपासामुळे अल्पावधीतच मिसिंग मुलाचा शोध लागल्याने कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला, हे विशेष. 

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More