नागपूरकर जेष्ठ दाम्पत्याचा उत्तराखंडमध्ये दुर्दैवी मृत्यू

कार दरीत काेसळली, गंगाेत्री महामार्गावरील भीषण अपघात

The Exposer
नागपूर : उत्तराखंडमधील गंगोत्री महामार्गावर हेल्गुगाड परिसरात झालेल्या भीषण अपघातात नागपूरच्या ज्येष्ठ दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे रामटेककर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून नागपूरातील न्यू डायमंडनगर परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांची ओळख दामोदर हरिराम रामटेककर (७७) व लक्ष्मी दामोदर रामटेककर (६७), रा. न्यू डायमंडनगर, दिघोरी, नागपूर अशी करण्यात आली आहे. त्यांचे पार्थिव सोमवारी दुपारी नागपुरात आणण्यात आले. त्यानंतर सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, रामटेककर दाम्पत्य धार्मिक यात्रेनिमित्त उत्तराखंडला गेले होते. गंगोत्रीहून परत येत असताना हेल्गुगाड परिसरात त्यांच्या वाहनावर अचानक मोठा दगड कोसळला. त्यामुळे वाहनचालकाचे नियंत्रण सुटून कार खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात रामटेककर दाम्पत्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात वाहनचालक जसवीर सिंह तसेच ओडिशातील एक दाम्पत्य जखमी झाले. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नसून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, उत्तराखंड पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे. रामटेककर दाम्पत्याच्या निधनामुळे त्यांच्या नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.  मृतदेह साेमवारी दुपारी नागपुरात आणण्यात आले आणि सायंकाळच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती समाेर आली आहे. घटनेमुळे नागपूरातील न्यू डायमंडनगर परिसरात शाेककळा पसरली असून, रामटेककर दाम्पत्याच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. उत्तराखंड पाेलिसांनी अपघाताची नाेंद करून पुढील तपास सुरू केला आहे

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More