तांत्रिक तपासाचा अचूक वेध; 4.50 लाखांचा सोन्याचा हार हस्तगत!

– गुन्हे शाखा युनिट-02 ची दमदार कामगिरी; चोरीचा गुन्हा उघडकीस, आरोपी जेरबंद


The Exposer
नागपूर : गुन्हे शाखा युनिट क्र. 02 ने तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 5 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अप.क्र. 279/26, कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढला.
या प्रकरणात जैन अली रिजवान अली बंदाली (वय 28 वर्षे), रा. राजुरा, जि. चंद्रपूर (सध्या प्लॉट नंबर 159, दुर्गा लेआऊट, नरेंद्रनगर चौक, नागपूर) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून 37 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार (किंमत 4.50 लाख रुपये), झेस्ट मोपेड (MH-31-FD-3607) किंमत 35 हजार रुपये आणि मोबाईल फोन किंमत 20 हजार रुपये असा एकूण 5.05 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कायदेशीर कारवाईसाठी सदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More