The Exposer
नागपूर : ग्लोबल युनायटेड एज्युकेशनल अँड सोशल सोसायटी, नागपूर यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम मंगळवार, दि. १६ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, नागपूर येथील नागार्जुन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष निशांतजी मेश्राम हे राहणार आहेत.
प्रमुख उपस्थिती म्हणून नागपूर समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे, प्रा. डॉ. महेंद्रकुमार मेश्राम, ऑरेंज सिटी कॉलेज ऑफ सोशल वर्कचे प्राचार्य प्रा. डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांची उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना शिक्षण, करिअर, स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्त्व विकास आणि भविष्यातील संधी याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संस्थेचे सचिव क्षितिज गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी, पालक, शिक्षक, बुद्धिजीवी वर्ग तसेच समाजातील सर्व नागरिकांनी या प्रेरणादायी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











