घरफोडी करून मौजमजा करणारे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात; चोरीच्या पैशातून घेतलेली कारही जप्त!

 – यशोधरानगर पोलिसांनी घरफोडीचा केला पर्दाफास; तीन सराईत आरोपी जेरबंद, १०.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त

The Exposer
नागपूर : यशोधरानगर पोलिसांनी घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत तीन आरोपींना अटक करून तब्बल १० लाख ६४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

फिर्यादी अंजुम अनीस कुरेशी (वय ३४) रा कुंदनलाल गुप्ता नगर, या हैदराबाद येथे लग्नसमारंभासाठी गेल्या असताना, त्यांच्या घराच्या मागील बाजूची खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना १२ मे ते १ जून २०२६ दरम्यान घडली होती.

याप्रकरणी यशोधरानगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५(ए), ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपीना अटक केली.
मोहम्मद नूर उर्फ अय्यार नसीरुद्दीन अन्सारी (१९),
सलमान खान बल्द इक़बाल खान (३०), मोहम्मद फैजल मोहम्मद फैयाज अन्सारी (२१) अशी आरोपीचे नावे असून तिन्ही आरोपी यशोधरानगर परिसरातील रहिवासी आहेत
यांच्या ताब्यातून १,७६,५०० रुपये रोख, ५,८८,००० रुपये किमतीचे ०६ तोळे सोन्याचे दागिने, ३,००,००० रुपये किमतीची चारचाकी (चोरीच्या पैशातून खरेदी केलेली) असा एकूण १०,६४,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपआयुक्त परिमंडळ क्र. ०५ नित्यानंद झा व सहाय्यक पोलीस आयुक्त (कळमना विभाग) रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनुस चाँद शेख, पोलिस उपनिरीक्षक सदाशिव कणसे, पोलिस हवालदार प्रशांत कोडपे, पोलिस अंमलदार राहुल इंगोले, साजिद खान, पोलिस शिपाई अमोल भेंडेकर, नितेश मिश्रा, राकेश तिडके, यांच्या अथक परिश्रमांमुळे घरफोडीचा गुन्हा उघडकीस येऊन आरोपींना अटक करण्यात यश आले.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More