– सात आरोपीना अटक, गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 ची धडक कारवाई

The Exposer
नागपूर : नंदनवन परिसरात ५०० रुपयांच्या नोटांचे बनावट बंडल तयार करून दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा युनिट-५च्या पथकाने रंगेहात अटक केली. आरोपींकडून बनावट नोटांचे बंडल, मोबाईल फोन तसेच होंडा सिटी व बोलेरो कार जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परवेज अहमद उर्फ शरीफ पटेल याच्या हसनबाग येथील मालकीच्या आणि संचालित बिलाल इंटरप्रायझेस येथे ही फसवणुकीची योजना राबवित होता. आरोपी ५०० रुपयांच्या नोटांच्या बंडलाच्या वर व खाली खऱ्या नोटा ठेवून मध्ये कोरे कागद भरत असत. हे बंडल खऱ्या नोटांचे असल्याचा भास निर्माण करून ५० हजार रुपयांच्या बदल्यात २ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले जात होते.
तक्रारदाराला अशाच प्रकारे जाळ्यात ओढून खऱ्या नोटांच्या बदल्यात कागदांनी भरलेले बंडल देऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडले. कारवाईदरम्यान बनावट नोटांचे बंडल, मोबाईल फोन तसेच घटनास्थळी असलेल्या होंडा सिटी आणि बोलेरो वाहनांची जप्ती करण्यात आली.
याप्रकरणी तक्रारदाराच्या फिर्यादीवरून नंदनवन पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपीमध्ये परवेज अहमद मो. शरीफ पटेल (50, नंदनवन), अवतारसिंग जग्गूसिंग जुनी (40, चंद्रपूर), अंकित लीलाधर वासनिक (30, भंडारा), अंकित राजेंद्र सूर्यवंशी (35, नंदनवन), अदनान रोशन खान उर्फ आशू (31, नंदनवन), मो. मनान मो. इद्रीस शेख (46, वाठोडा), शाहरुख मनसुफ खान (31, चंद्रपूर), यांचा अटकेतील आरोपितांमध्ये समावेश आहेत.
तर आरोपी नरेश बुचके (परभणी), पाटील (हिंगोली) असे दोन आरोपी फरार आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) डॉ. राहुल माकणीकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्र. 05 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय गणेश कदम, पोलिस हवालदार राजेश टाकलीकर नजीर शेख, रुपेश नानवटकर, राजूसिंग ठाकूर, मुकेश राऊत, प्रमोद बावणे, अनिस खान, रोशन तांदुळकर, विशाल नागभीडे, आशिष पवार, लीलाधर खिरटकर यांनी केली. विशेष सहकार्य घरफोडी पथकाचे पोलिस निरीक्षक दिलीप चंदन, सहायक पोलिस निरीक्षक मंगला हरडे यांचे मिळाले.
Author: संतोष तायडे
संपादक











