पहाटेची धडक कारवाई! 31.5 किलो गांजासह तस्कर गजाआड

– 23 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखेचा ‘ऑपरेशन गांजा’ यशस्वी

The Exposer
नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत तब्बल 31.500 किलो गांजा जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत गांजासह मोबाईल फोन व वाहन असा एकूण 23 लाख 7 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 20 जून 2026 रोजी पहाटे 3 वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना EDM ADDA Restro Lounge समोरील परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तीची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान त्याच्याकडून 31.500 किलो गांजा आढळून आला.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद शफीक वल्द मोहम्मद जहरूद्दीन खान (वय 32) रा. 105 साई रेसीडंसी 2, सदभावना सोसायटी, कडोदरा, वरेली, सुरत, गुजरात, ह. मु. पोलिस ठाणे अंतू जवळ, प्रतापगढ, उत्तर प्रदेश, असे आहॆ. तर त्याचा साथीदार एजाजखान हा फरार आहॆ.

कारवाईदरम्यान आरोपीकडून 7 लाख 87 हजार 500 रुपयांचा गांजा, 20 हजार रुपयांचा विवो कंपनीचा मोबाईल फोन आणि 15 लाख रुपयांची टाटा कंपनीची कार असा एकूण 23 लाख 7 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी वाडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलिस निरीक्षक दर्शन पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी ननवरे, हवालदार समाधान गिते, नायक पोलिस शिपाई शेषराव राऊत, पोलिस शिपाई अश्विन मांगे, कुणाल मसराम, समीर शेख, नितीन आदिनी केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More