– विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात; चोरीतील तब्बल ₹४.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त
The Exposer
नागपूर : नागपूरातील जरीपटका परिसरात मोबाईल दुकान फोडून सुमारे ₹७ लाख किमतीचे २५ मोबाईल फोन चोरी करणाऱ्या प्रकरणाचा जरीपटका पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून १३ महागडे मोबाईल फोन आणि चोरीत वापरलेली क्रमांक नसलेली अॅक्टिव्हा स्कूटर असा एकूण ₹४.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फिर्यादी यश सिद्धार्थ गजभिये यांच्या मोबाईल दुकानाचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी आयफोन, सॅमसंग, व्हिवो, शाओमी, वनप्लस आदी कंपन्यांचे २५ मोबाईल फोन लंपास केले होते. या प्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून चोरीतील १३ मोबाईल फोन आणि चोरीत वापरलेली अॅक्टिव्हा स्कूटर जप्त करण्यात आली. उर्वरित मुद्देमालाचा शोध सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. यातील एका फरार आरोपीच्या मागावर पोलिस आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशीष मोरखडे, पोलिस हवालदार रमेश यादव, मंगेश दोनाडकर, पंकज वरकड, राकेश सिंग, नितेश नागपुरे, जरीपटका पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
Author: संतोष तायडे
संपादक











