– संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांनी बदलीचे निर्देश दिल्यानंतरही कारवाई नाही
– अधिष्ठातांचे दुर्लक्ष, सफाई कर्मचाऱ्यांवरील त्रास कायम, युनियनचा गंभीर आरोप
The Exposer
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), नागपूर येथील स्वच्छता निरीक्षक नरसिंह देवडकर यांच्याविरोधातील तक्रारीवरून आता नवे वळण आले आहे. नॅशनल स्वच्छकार युनियन ऑफ इंडियाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर करत, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन (DMER), मुंबई यांनी दिलेल्या आदेशाची मेडिकलच्या अधिष्ठाता यांनी अंमलबजावणी न करता त्याला केराची टोपली दाखविल्याचा गंभीर आरोप केला आहे.

युनियनच्या म्हणण्यानुसार, सफाई कर्मचाऱ्यांकडून वारंवार करण्यात आलेल्या तक्रारींची दखल घेत DMER ने 30 मे 2025 रोजी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर यांना पत्र पाठवून संबंधित स्वच्छता निरीक्षकाविरोधात तातडीने संस्थांतर (बदली) करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. एवढेच नव्हे तर स्वच्छता निरीक्षक हे गेल्या 12, वर्षांपासून एकाच संस्थेत कार्यरत असण्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

मात्र, सुमारे दोन महिन्यांनंतरही त्या आदेशाची अंमलबजावणी झालेली नसल्याचा दावा युनियनने केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याच्या वर्तनामुळे सफाई कर्मचाऱ्यांना होणारा कथित मानसिक व प्रशासकीय त्रास कायम असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. युनियनने आपल्या तक्रारीत संबंधित स्वच्छता निरीक्षकावर कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरणे, धमकावणे, आर्थिक मागण्या करणे तसेच कामकाजात मनमानी करणे असे गंभीर आरोप केले आहेत.
या तक्रारींची दखल घेत DMER ने कारवाईचे निर्देश दिले असतानाही मेडिकल प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. युनियनने मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात, शासकीय आदेशाची मेडिकल अधिष्ठातांनी अंमलबजावणी न करणे हे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असून, संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून
Author: संतोष तायडे
संपादक











