– दुसरा आरोपी फरार; धंतोली हद्दीत गुन्हे शाखा युनिट क्र. २ ची धडक कारवाई
The Exposer
नागपूर : गांजाचे छोटे-छोटे पुडे तयार करून परिसरात विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींवर गुन्हे शाखा युनिट क्र. २ ने धडक कारवाई करत २ किलो ६९ ग्रॅम गांजा आणि पॅकिंगसाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण ५६ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत आसिफ आरिफ खान (वय ३२) याला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार शैलेश सोनटक्के हा फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै २०२६ रोजी धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरस्वती नगर, तकिया, धंतोली येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपी गांजाचे छोटे-छोटे पुडे तयार करून किरकोळ स्वरूपात विक्री करत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट क्र. २ ला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला.
या कारवाईदरम्यान आसिफ आरिफ खान (रा. शैलेश सोनटक्के यांच्या घरी भाड्याने, सरस्वती नगर, तकिया, धंतोली) याला अटक करण्यात आली. मात्र, त्याचा साथीदार शैलेश सोनटक्के हा घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
यावेळी पोलिसांनी २ किलो ६९ ग्रॅम गांजा, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे पाउच, सीलिंग मशीन, मोबाईल फोन, असा एकूण ₹५६,३८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
प्राथमिक तपासात आरोपी गांजा वजन करून त्याचे छोटे-छोटे पुडे तयार करत ग्राहकांना विक्रीसाठी पुरवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना गांजाचा पुरवठा करणारे आणि त्यांच्याकडून अमली पदार्थ खरेदी करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
ही कारवाई गुन्हे शाखा, युनिट क्र. २ च्या पोलिस निरीक्षक शुभांगी देशमुख यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक मनोज राऊत, सहायक पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र ठाकूर, पोलिस हवालदार महेंद्र शेडमाके, प्रवीण शेळके, कमलेश गनेर, विजय यादव, अर्जुन यादव, सुरेश तेलेवार, आशिष धंदरे, मंगल जाधव, संदीप पांडे, कमलेश गहेलोत, प्रवीण चव्हाण, विवेक श्रीपाद यांनी केली.
Author: संतोष तायडे
संपादक











