कलमना पोलिसांची दमदार कारवाई : तीन सराईत वाहनचोर जेरबंद

– चोरीच्या तीन दुचाकींसह ₹1.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

The Exposer
नागपूर : शहरातील कलमना पोलीस ठाण्याच्या पथकाने प्रभावी तपास करत वाहनचोरीच्या तीन स्वतंत्र गुन्ह्यांची उकल करून तीन सराईत आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे ₹1 लाख 80 हजार इतकी आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एक विधिसंघर्षग्रस्त बालक, जुनेद उर्फ जुनेद असरार खान (वय १९, रा. मोठा ताजबाग, नागपूर), मो. साजिद उर्फ मो. सलीम (वय १९, रा. कामठी, नागपूर) आणि पियुष उर्फ गड्डा दीपक निमजे (वय २०, रा. पाचपावली, नागपूर) यांचा समावेश आहे.

या आरोपींकडून पो. ठाणे कलमना गुन्हा क्र. 666/2026, 605/2026 आणि 641/2026 या तीन गुन्ह्यांतील चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. जप्त वाहनांमध्ये स्प्लेंडर व प्लॅसर कंपनीच्या दुचाकींचा समावेश असून त्यांची एकूण किंमत ₹1,80,000 इतकी आहे.

तपासादरम्यान आरोपींकडे सखोल चौकशी करण्यात आली असता त्यांनी तीनही वाहनचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याने संबंधित गुन्ह्यांची उकल झाली. तपासात आरोपी हे सराईत वाहनचोर असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

ही कामगिरी शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रभाग वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्र. ५ चे नित्यानंद झा, सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक (गुन्हे) करीम पठाण, पोउपनि गजानन राऊत, पोहेवा प्रमोद कंगाले, पोशि विशाल भेसारे, पोशि नितीन मिश्रा, ललित शेंडे, अविनाश ग्वालबंशी यांनी केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More