गिट्टीखदान व वाहतूक शाखेतील दोन पोलीस निरीक्षकांची अदलाबदल

– नागपूर पोलिसांत मोठा प्रशासकीय फेरबदल

The Exposer
नागपूर : नागपूर शहर पोलीस आयुक्तालयात प्रशासकीय कारणास्तव दोन पोलीस निरीक्षकांच्या तात्पुरत्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी 27 जुलै 2026 रोजी हा आदेश काढला असून संबंधित अधिकाऱ्यांना नव्या नियुक्तीच्या ठिकाणी तत्काळ रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आदेशानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गिट्टीखदान) पदावर कार्यरत असलेल्या ललिता नानाजी तोडसे यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. तर गुन्हे शाखेतील वाहन चोरी प्रतिबंधक पथकात कार्यरत पोलीस निरीक्षक सारंग कृष्णराव मिराशी यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गिट्टीखदान पोलीस ठाणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्तालयाने जारी केलेल्या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी नव्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर होऊन रुजू झाल्याची दिनांक व वेळ कार्यालयात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या प्रशासकीय बदल्यांमुळे गिट्टीखदान पोलीस ठाणे आणि वाहतूक शाखेच्या कार्यपद्धतीत नवे नेतृत्व मिळणार असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More