कळमणा पोलिसांचा ड्रग्ज तस्करांवर प्रहार! 2.043 किलो गांजासह चारचाकी जप्त

– 4.60 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोघे अटकेत

The Exposer
नागपूर : कळमणा पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील कारवाईत मोठे यश मिळवत 2.043 किलो गांजा, एक मोबाईल फोन आणि फोर्ड फिगो चारचाकी वाहनासह एकूण 4 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतिक रफीक खान (वय 33), अमित विनायक मानकर (वय 37)अशी आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार 6 ऑगस्ट 2026 रोजी नियमित पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना हरिस्तीनगर येथून भिलगाव सिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयास्पद स्थितीत उभी असलेली फोर्ड फिगो कार आढळली. वाहनाची तपासणी केली असता त्यामधून 2 किलो 43 ग्रॅम गांजा, अंदाजे किंमत ₹50,000, वनप्लस कंपनीचा मोबाईल – अंदाजे किंमत ₹10,000, फोर्ड फिगो चारचाकी – अंदाजे किंमत ₹4,00,000, असा एकूण ₹4,60,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी कळमणा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 707/2026 अंतर्गत कलम 8(क), 20(ब)(ii)(ब), 29 एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचन्द्र रेड्डी, दक्षिण प्रभागाचे अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त परिमंडळ क्रमांक- 5, नित्यानंद झा, सहाय्य्क पोलिस निरीक्षक रोहित ओव्होळ यांच्या मार्गदर्शनाखाली कलमना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण काळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे ) करीम पठाण, पोलिस उपनिरीक्षक गजानन राऊत, पोलिस हवालदार प्रमोद कंगाले, विशाल भेसारे, पोलिस अंमलदार नितीन मिश्रा, ललित शेंडे, अविनाश ग्वालबंशी, प्रवीण इवनाते आदींनी केली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कळमणा पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. नागरिकांनी अमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांना कळवून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More