– अतिउत्कृष्ट सेवेसाठी नागपूर पोलिसांचा गौरव- गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस महासंचालकांचे पदक
– शहर, ग्रामीण व एसीबीतील पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा समावेश
The Exposer
नागपूर : पोलिस दलात उल्लेखनीय, गुणवत्तापूर्ण आणि उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या ‘अतिउत्कृष्ट सेवा पदका’मध्ये नागपूर पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश झाला आहे.नागपूर शहर पोलिस दलातील PSI सुनील गोपीनाथ जाधव, अशी अनिल संतोषराव तुमसरे आणि ASI पंचभाई यांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी पोलिस महासंचालकांचे पोलिस पदक जाहीर झाले आहे.

त्यांच्या उल्लेखनीय सेवेमुळे नागपूर शहर पोलिस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. यासोबतच नागपूर ग्रामीण पोलिस दलातील पीआय प्रमोद घोंगे, नरेंद्र गौरखेडे, बटू पांडे, अजय तिवारी, रत्नाकर ठाकरे आणि चंद्रकांत काळे यांचाही अतिउत्कृष्ट सेवा पदकासाठी निवड झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये समावेश आहे.

तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील विजय माहुलकर, ज्ञानेश्वर नारखेडे, मनोहर जंगवाड, भरत ठाकूर आणि संजय नवदेती यांच्यासह नागपूर विभागातील एकूण २६ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पदकप्राप्त मानकरी म्हणून समावेश झाला आहे. पोलिस दलातील कर्तव्यनिष्ठा, उत्कृष्ट तपास, उल्लेखनीय कामगिरी आणि गुणवत्तापूर्ण सेवेला मिळालेली ही दखल असून, या पदकामुळे नागपूर पोलिस दलातील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव झाला आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















