६०व्या वाढदिवशी आ. विकास ठाकरे यांची लड्डू तुला; कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला

 

The Exposer
नागपूर : पश्चिम नागपूरचे आमदार विकासभाऊ ठाकरे यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व कार्यकर्त्यांच्या उपक्रमातून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने दक्षिण-पश्चिम काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार विकास ठाकरे यांची लड्डू तुला करण्यात आली.

या उपक्रमाला कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांची मोठी उपस्थिती होती. लड्डू तुला करून आमदार विकास ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. निरोगी दीर्घायुष्य लाभावे आणि जनसेवेचे कार्य अधिक जोमाने सुरू राहावे, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

कार्यक्रमादरम्यान लड्डूंचे वाटप करून उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांनी वाढदिवसाच्या आनंदात सहभाग घेतला. आमदार ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More