रुग्णसेवेसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सज्ज; कार्यकर्त्यांची आढावा बैठक

– योजनांची दिली सविस्तर माहिती, उत्कृष्ट रुग्णसेवकांचा गौरव; नव्या ‘रुग्णमित्रां’ची नियुक्ती

The Exposer 
नागपूर : वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना, नागपूर जिल्हा व शहर वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने रुग्णसेवेसाठी तत्पर असलेल्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक शनिवारी उत्साहात पार पडली. या बैठकीत गरीब व गरजू रुग्णांना विविध शासकीय योजना आणि धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून वैद्यकीय मदत कशी उपलब्ध करून देता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री ॲड. आशिषजी जयस्वाल उपस्थित होते. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख वर्धराज पिल्ले, शिवसेना कायदे विभागाचे पूर्व विदर्भ प्रमुख ॲड. बुरहानूल हसन शेख तसेच वैद्यकीय मदत कक्षाचे विदर्भ प्रमुख प्रवीण लता बालमुकुंद शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी केंद्र सरकारची आयुष्मान भारत योजना, राज्यातील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी तसेच विविध धर्मादाय ट्रस्टच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मिळणाऱ्या वैद्यकीय मदतीची माहिती कार्यकर्त्यांना देण्यात आली.

रुग्णसेवेत उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव पुरस्कार व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नव्या कार्यकर्त्यांची ‘रुग्णमित्र’ म्हणून नियुक्ती करण्यात आली. रुग्णसेवेत योगदान देणाऱ्या काही सेवकांना ‘विदर्भ गौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.

बैठकीस महिला आघाडीच्या विदर्भ प्रमुख नेहा अंबादे, जिल्हाप्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर जिल्हाप्रमुख सचिन भाऊ शर्मा, उपजिल्हाप्रमुख शहाबुद्दीन शेख, पूर्व नागपूर विधानसभा संघटक राकेश दादा बोकडे यांच्यासह शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, महिला आघाडी वैद्यकीय मदत कक्ष, शिवसेना कायदे विभाग, युवासेना, महिला आघाडी, वाहतूक सेना तसेच विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधा

गरजू रुग्णांना तातडीची मदत व मार्गदर्शन मिळावे यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे ९८५०७३५१०७, ७०२०८७५२८३ आणि ९१६८९८०१९६ हे संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

– प्रवीण लता बालमुकुंद शर्मा
विदर्भ प्रमुख, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More