– आवळे बाबू चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध व कर्मवीर बाबू हरीदासजी आवळे यांना अभिवादन
The Exposer
नागपूर : रिपब्लिकन पक्षाचा ६९वा स्थापना दिवस नागपूर शहर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आवळे बाबू चौक (कमाल चौक) येथील कर्मवीर बाबू हरीदासजी आवळे स्मृती परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर कर्मवीर बाबू हरीदासजी आवळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रिपब्लिकन कार्यकर्ते राजकुमार मेश्राम होते. कार्यक्रमाचे आयोजन बाळू कोसमकर यांनी केले. स्थापना दिनानिमित्त मोठ्या संख्येने रिपब्लिकन कार्यकर्ते एकत्र आल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी कृष्णराव बोरकर, संजय पाटील, समूहघोष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष उमेश बोरकर, रामदास गजभिये, यशवंत तेलंग, नरेश वाहाणे, आनंदराव खोब्रागडे, हेमंत नंदेश्वर, सुधीर पाटील, राजू फुलके, भगवान गजभिये, नरेंद्र चौधरी, अॅड. निमगडे, अॅड. मेश्राम, हिरालाल बोरकर, श्याम मेश्राम, हरीश जानोरकर, बी.टी. वाहणे, संपत वंजारी, आनंद वानखेडे, ईश्वर सूर्यवंशी, मनोज गणवीर, सुरेश बोधकर, गोवर्धन साहारे यांच्यासह असंख्य रिपब्लिकन कार्यकर्ते उपस्थित होते.
Author: संतोष तायडे
संपादक















