– कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबरला भव्य समारोह
The Exposer
नागपूर : सामाजिक न्याय, समता आणि मानवमुक्तीसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त नागपुरात भव्य जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमधील नागसेन सभागृह, कामठी रोड, नागपूर येथे हा कार्यक्रम होणार आहे.
दादासाहेब गायकवाड यांनी वंचित, शोषित आणि उपेक्षित समाजघटकांच्या हक्कांसाठी संघर्ष करत सामाजिक समतेची चळवळ अधिक व्यापक केली. त्यांच्या संघर्षमय विचारांचे स्मरण आणि नव्या पिढीपर्यंत त्यांचा समतेचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने या जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर पदमश्री दादासाहेब गायकवाड प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश जीवने राहणार असून, कवीयत्री, लेखक, समीक्षक सरिताताई सातार्डे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला कर्मवीर पदमश्री दादासाहेब गायकवाड प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रकाशजी कुंभे आणि रिपब्लिकन चळवळीतील जेष्ठ नेते दिनेशजी शर्मा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून क्षितिज गायकवाड यांची भूमिका आहे.
दादासाहेब गायकवाड यांच्या समता, सामाजिक न्याय, बंधुता आणि मानवमुक्तीच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















