बेसामधील आनंद सोसायटीत नागरिकांनी केले वृक्षारोपण 

The Exposer
नागपूर : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धन व हरित परिसर निर्मितीच्या उद्देशाने आनंद सोसायटीच्या उद्यानात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी एकूण ११ वृक्षांचे रोपण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संरक्षणामध्ये वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी अधिकाधिक वृक्ष लागवड करावी तसेच त्यांचे संगोपन व संवर्धन करावे, असे आवाहन केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि भावी पिढ्यांना स्वच्छ व निरोगी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी वृक्षारोपण अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात राजेश पुरी, प्रवीण वसाड, श्रीकांत बनाईत, विजय लिडबे, प्रदीप वाघ, विनोद धांडरे, हेलोंडे, ढोते, शेळके तसेच इतर मान्यवर नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उपस्थित सर्व सदस्यांनी लावलेल्या वृक्षांची नियमित देखभाल व संरक्षण करण्याचा संकल्प केला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More